भारतीय नौसेनेच्या महिला निघाल्या समुद्र सफर करता करता विश्व भ्रमंतीला | Lokmat Marathi News

2021-09-13 0

भारतीय नौसेनेचे आयएनएसव्ही तारिणीने विश्वभ्रमंतीसाठी निघालेल्या महिलांनी सर्वात कठीण केप होर्न शुक्रवारी सकाळी पार केला. या जहाजाचे सर्व क्रु मेंबर्स महिला आहेत. भारतीय नौसेनेचे प्रवक्ता कॅप्टन डी. के. शर्मा यांनी सांगितले की, जहाजाने सकाळी ६ वाजता दक्षिण बिंदूवरील केप होर्न पार केले.चालक दलाने या विजयाचे प्रतीक म्हणून जहाजावरून तिरंगा फडकवला. ७० किलोमीटर ताशी वेगाने हवा वाहत असताना देखील जहाजाने तो बिंदू अगदी व्यवस्थित पार केला.लेफ्टिनेंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टिनेंट कमांडर प्रतिभा जामवाल, पी. स्वाती, लेफ्टिनेंट एस. विजया देवी, बी. एश्वर्या आणि पायल गुप्ता या नौसेनेच्या महिला सप्टेंबर २०१७ ला समुद्रमार्गे विश्व भ्रमंतीसाठी निघाल्या होत्या. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires